युवराजांना वाचवण्यासाठी ठाकरेंनी दिली ५० कोटींची ऑफर

मुंबई – दिशा सालियान-सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ५० कोटींची ऑफर दिली होती. असा मोठा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. दिशा आणि सुशांत सिंगची केस ज्या दिशेने चालली आहे त्यामध्ये आदित्य ठाकरेला अटक होणारच अशी शक्यता निर्माण झाली आहे.

जे शिंदेंच्या आमदारांवर पन्नास खोकेंचा जो काय आरोप करायचे, मग उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला आणि देशाला एक उत्तर द्यावं जे वकील आणि जे तक्रारदार दिशा आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये कोर्टात गेले, त्यांनी केस मागे घ्यावी यासाठी पन्नास कोटीची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली आहे का नाही? असा खुलासा राणेनी केला.

नितेश राणे म्हणाले, “तुमच्या मुलाचा दिशा आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये काहीच हातभार नाही, तर तुम्ही संबंधित वकिलाला आणि त्यांच्या लोकांना पन्नास कोटीची ऑफर का करता? दुसऱ्या जणांना पन्नास खोके पन्नास खोके चिडवायचं आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी पन्नास खोके घेऊन फिरायचं की माझ्या मुलाला वाचवा माझ्या मुलाच्या विरुद्ध केस मागे घ्या. यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं उत्तर द्यावं.” अशी मागणी राणेंनी केली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh