सुनसगाव सरपंचपदी गोंभी च्या काजल कोळी विराजमान !

भुसावळ – ( प्रतिनिधी जितेंद्र काटे )तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल अतिशय धक्कादायक लागला असून यामध्ये सुनसगाव सरपंच पदासाठी चुरशीच्या लढतीत गोंभीच्या काजल भोजराज कोळी यांनी बाजी मारली आहे तर ‘ दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ‘ असा प्रकार येथे पाहायला मिळाला असून सुनसगाव येथील सरपंच पदाच्या सहा उमेदवारांना मागे टाकून गोंभी गावातील काजल कोळी यांनी बाजी मारल्याने अभिनंदन केले जात आहे .सरपंचासह निवडून आलेल्या उमेदवारांचे मते पुढील प्रमाणे – सरपंच काजल भोजराज कोळी ( ३९२) वार्ड क्रमांक १ – अनुसूचित जमाती शामराव महारु मालचे (२३३) , सर्वसाधारण स्री रत्नप्रभा विकास पाटील ( २८०) व वैशाली युवराज पाटील (३०१) वार्ड क्रमांक २ – अनुसूचित जाती एकनाथ फुलसिंग सपकाळे (२२९), अनुसूचित जमाती स्री गायत्री राहूल नारखेडे (३३३) , सर्वसाधारण चंद्रकांत नामदेव पाटील (१८८) आणि वार्ड क्रमांक ३ – सर्वसाधारण सुनिल परशुराम कंकरे ( २७२), नामाप्र स्री ४७५ आणि शोभा रामचंद्र शिरसाळे (बिनविरोध) अशा प्रकारे उमेदवार विजयी झाले आहेत मतदारांनी पॅनल टू पॅनल न धरल्याने एका पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवारासह सहा जागांवर अपयश मिळाले आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी आर्थिक उलाढाल केली असली मतदारांनी अनेक उमेदवारांकडून लक्ष्मी प्राप्त केली आणि मत तिसऱ्यालाच दिल्याची चर्चा असून अपयशाचे खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडले जात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh