महाराष्ट्रात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, ‘या’ 8 सवलती मिळणार

महाराष्ट्र सरकारनं 2023 या वर्षासाठी राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

शासन निर्णयानुसार, “जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये, गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करत आहे.”

दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 40 तालुक्यांमध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे :

1 जमीन महसुलात सूट.

2 पीक कर्जाचं पुनर्गठन.

3 शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती.

4 कृषी पंपाच्या चालू विजबिलाबात 33.5% सूट.

5 शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुक्लात माफी.

6 रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता.

7 पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे.

8 शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

महाराष्ट्रात यावर्षी आत्तापर्यंत सरासरीपेक्षा कमी म्हणजे 89 टक्के पाऊस पडलाय. मागील वर्षी याच कालावधीत (ऑगस्ट 2022) पर्यंत सरासरीच्या 122.8 टक्के पाऊस झाला होता.

ऑगस्ट 2023 पर्यंत राज्यातल्या तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या फक्त 50 ते 75 टक्के इतका पाऊस झालाय. 13 जिल्ह्यांमध्ये 75 ते 100 टक्के इतका पाऊस झालाय. तर सहा जिल्हे असे आहेत जिथे 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालाय.

राज्यभरात 25 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये 41 महसूल मंडळात सलग 21 दिवस पाऊस पडलेला नाहीये.

नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमधल्या 41 महसूल मंडळात पाऊस झालेला नाहीये.

एकूणच काय तर महाराष्ट्रात यंदा दुष्काळी स्थिती निर्माण हण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून सध्या काही पावले उचलली जातायत.

‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

ताजा खबरें