प्रतिनिधि – अमीर पटेल
यावल – मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून जळगांव जिल्ह्यात देखील विविध ठिकाणी राजकीय पुढऱ्याना गाव बंदी, राजीनामा सत्र, उपोषण, आदि विविध मार्गाने आंदोलने सुरू आहेत. अश्यातच जळगांव जिल्ह्यातील यावल येथे देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज यावल येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे माजी सभापती रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणास सुरवात करण्यात आले. यावेळी यावल तालुक्याच्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही जो पर्यन्त आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया रवींद्र पाटील यांनी दिली.