मुंबई – पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र वाटप सुरुवात करायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे समितीकडे उपलब्ध असलेल्या डेटा नुसार सरकार तत्काळ प्रमाणपत्र वटपाला सुरुवात करणार आहे.
सध्या समितीकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
उद्या तहशीलदारांची बैठक बोलवून जुन्या नोंदी सापडलेल्यांना तात्काळ प्रमाण पत्र देण्याच्या सूचना केल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात तहसीलदारांची उद्या बैठक होईल, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतील. तहशीलदारांची बैठक बोलवून यामध्ये जुन्या नोंदी सापडलेल्यांना तात्काळ प्रमाण पत्र देण्याच्या सूचना केल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारून पुढची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आज मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. राज्यभरात मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदणीबाबत ही समिती आढावा घेत होती. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्याच्या काही भागात शांततेत आंदोलने सुरू आहेत, तर काही भागातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.