राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण…

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे, अशी माहिती खासदार प्रफुल पटेल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक कार्यक्रमांत उपस्थित नसल्याने पुन्हा एखदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.

मात्र या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेल यांनी हे ट्वीट केले आहे.

अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत यावरून उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, अजित पवार यांना डेंग्यु झाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत आणि पुढचे काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे.