सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट बनले आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड स्वीकालं जातं. बँक अकाउंट ओपन करण्यापासून तर शाळेमध्ये अॅडमिशन, घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड अत्यंत गरजेचं असतं.
सुरक्षेच्या हिशोबाने आधारसोबत तुमचा मोबाईल लिंक असणे खूप गरजेचे आहे. मात्र अनेक लोकांना माहिती नसतं की, त्यांचा कोणता मोबाईल नंबर आधारसोबत लिंक आहे.
जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे एक किंवा अधिक मोबाइल नंबर असतात तेव्हा हे घडते. त्यांना लक्षात राहत नाही की, त्यांनी कोणता नंबर आधारशी लिंक केला होता. आधार कार्ड बनवताना मोबाईल क्रमांकही टाकावा लागतो. जर तुम्ही नंतर नंबर बदलला असेल, तर तुम्ही आधार कार्डमध्ये नवीन नंबर देखील अपडेट करू शकता. आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक कामांसाठी, OTP आवश्यक आहे, जो फक्त आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर येतो.
अशी घ्या माहिती
तुमचा कोणता नंबर आधारशी जोडला गेला आहे हे तुम्हालाही माहीत नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. ते तुम्ही घरी बसल्या ऑनलाइन सहज शोधू शकता. चला जाणून घेऊया प्रोसेस…
-UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
-येथे My Aadhaar सेक्शनवर क्लिक करा.
-येथे Aadhaar Service ऑप्शनवर जा.
-Aadhaar Service मध्ये Verify an Aadhaar Number वर क्लिक करा.
-आपला 12 नंबरचा आधार नंबर टाका.
-Captcha कोड व्यवस्थित टाका.
-आता Proceed to Verify वर क्लिक करा.
-असे केल्याने, आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन नंबर दिसतील.
-जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर नंबर येथे दिसणार नाहीत.
चेक करु शकता हिस्ट्री
UIDAI ही आधार बनवणारी संस्था आधार कार्डची हिस्ट्री चेक करण्याची सुविधा देते. आधार हिस्ट्रीवरुन एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड कुठे वापरले जात आहे हे कळू शकत. तसंच ते प्रथम कुठे वापरले गेले? एवढेच नाही तर आधार कार्ड कोणत्या कागदपत्रांसोबत लिंक केले आहे हे देखील कळू शकते. आधारचा गैरवापर टाळण्यासाठी, UIDAI ने यूझर्सना आधार हिस्ट्री जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून ते वेळोवेळी ते तपासत राहू शकतील आणि कोणतीही तफावत आढळल्यास ते त्वरित पकडू शकतील.