दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो नक्की वाचा! ‘प्रात्यक्षिक’वर बोर्डाच्या पथकांचा वॉच; परीक्षा केंद्रांवर आता सरमिसळ विद्यार्थी

फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षेला सुरवात होणार असून तत्पूर्वी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ नोव्हेंबर, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.

दरम्यान, आता बोर्डाने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंमलबजावणीत थोडासा बदल केला असून प्रात्यक्षिक परीक्षेच्या पडताळणीसाठी बोर्डाकडून प्रत्येक जिल्ह्यात पथके पाठविली जाणार आहेत.

दरवर्षी इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा सुरु असताना पेपर सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचायला दिली जाते. पण, मागच्या वर्षी हा प्रकार बंद करून कॉपी प्रकरणाला आळा घालण्याचा प्रयत्न बोर्डाकडून झाला.

यंदाही तो बदल कायम राहणार आहे. दुसरीकडे आता एकाच शहरात एकापेक्षा जास्त परीक्षा केंद्रे असतील तर एका केंद्रांवरील मुले दुसऱ्या केंद्रांवर परीक्षा देतील, असाही बदल (बार्शी शहरात सहा केंद्रे आहेत, त्या केंद्रांवरील विद्यार्थी सरमिसळ करून सर्वच केंद्रांवर बसविले जातील.) या वर्षीपासून केला जाणार आहे. ज्याठिकाणी एकच परीक्षा केंद्र आहे, त्याठिकाणी असा बदल नसणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती किंवा इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे हा बदल असणार आहे. एका दिवशी जिल्ह्यात आलेली बोर्डाची पथके त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बहुतेक शाळांना भेटी देतील. गुणदानातील बनावटगिरी रोखण्यासाठी बोर्डाकडून असा नवीन निर्णय घेण्यात आला आहे.

पुस्तकी प्रात्यक्षिकाला आता पायबंद

अनेक दहावी- बारावीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकच होत नाही. प्रात्यक्षिक न घेताच विद्यार्थ्यांना गुण दिले जातात, अशा तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता बोर्डाचे प्रात्यक्षिक सुरु होईल, त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेतले जाते का, प्रयोग होतात का, याची पडताळणी बोर्डाच्या पथकांकडून होणार आहे.

त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी पथके नेमले जाणार आहे.

‘प्रात्यक्षिक’ची पडताळणी करणार बोर्डाची पथके

कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग बंद पडू नयेत म्हणून अनेक शाळा गैरहजर विद्यार्थ्यांची हजेरी दर्शवून त्यांनाही प्रात्यक्षिकचे गुण देतात. आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा आणि पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांनी आपल्याकडेच प्रवेश घ्यावे म्हणून हा प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षेवेळी विशेष पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला