जळगाव – जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेत शुक्रवारी (ता.२०) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशी एक हजारांवर उमेदवारी अर्ज दाखल झाले.
२३ आक्टोबरला अर्जांची छाननी तर २५ ला माघारी आहे. ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
जळगाव तालुक्यात १५ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणुका, तर दोन ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका होणार आहे. यासाठी जळगाव तालुक्यात एकूण ३९२ अर्ज दाखल झाले. त्यात सदस्य पदासाठी ३२२ तर सरपंच पदासाठी ७० अर्ज दाखल झाले आहेत.
निवडणूक कार्यक्रम
१६ ते २० ऑक्टोबर : अर्ज दाखल करणे
२३ ऑक्टोबर : अर्जांची छाननी
२५ ऑक्टोबर : अर्ज माघारी, चिन्हवाटप
मतदान : ५ नोव्हेंबर
निवडणुका होणारे तालुके व ग्रामपंचायती
तालुका सार्वत्रिक निवडणुका पोटनिवडणुका
पारोळा ११ ९
भडगाव ८ ५
अमळनेर १४ ११
चाळीसगाव १२ १०
भुसावळ ७ ४
पाचोरा ४ १४
एरंडोल ७ ३
रावेर १३ २१
जामनेर १७ २०
चोपडा २२ ४
जळगाव १५ ४
बोदवड ५ १
मुक्ताईनगर ४ ४
यावल १० १५
धरणगाव १८ ३
एकूण १६७ १२८