यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील मतदार यादीतील रद्द केलेली नावे उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा समाविष्ट

यावल – :तालुक्यातील बर्‍याच गावांमधील नागरिकांचे मतदार यादी मधून नावे प्रशासनाच्या चुकीमुळे कमी करण्यात आलेले होते. नागरिकांची जानेवारी २०२३ च्या मतदार यादीत नावे असताना त्यांची नावे एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी मधून स्थलांतर तसेच इतर काही कारणास्तव वगळण्यात आलेली होती. त्यामुळे सुरू असलेल्या ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येत नव्हते. म्हैसवाडी तालुका यावल येथील सुहास सुकलाल कोळी तसेच काजल प्रकाश बाविस्कर यांचे नाव देखील स्थलांतराचे कारण देऊन मतदार यादीतून वगळण्यात आलेले होते. त्यांनी एडवोकेट जितेंद्र पाटील यांचेमार्फत माननीय उच्च न्यायालयात धाव घेतली . १२ ऑक्टोबर २०२३ रोजी न्यायालयात प्रकरण दाखल झाले. त्यावर न्यायालयाने १३ ऑक्टोंबर रोजी तात्काळ सुनावणी घेऊन प्रशासनास संबंधितांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार काजल प्रकाश बाविस्कर यांनी उमेदवार म्हणून म्हैसवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्जदार दाखल केला. मतदार यादी मधून कोणतेही कारण नसताना अशा बऱ्याच मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहे. ज्यांची नाव वगळण्यात आलेली होती, त्यांची नावे फायनल मतदार यादी मध्ये घेण्यासाठी २१ ऑगस्ट पर्यंतची मुदत असल्याने दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी संबंधितांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार यावल यांच्याकडे योग्य पद्धतीने हरकत घेतलेली होती. तरी देखील त्यांची नावे फायनल मतदार यादीत समाविष्ट नव्हती. त्यांनी एडव्होकेट अजय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये धाव घेऊन एडव्होकेट जितेंद्र पाटील यांच्यामार्फत न्यायालयात बाजू मांडली व त्यांना मा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून योग्य मिळाला आहे.