जळगाव – यावल तालुक्यातील आडगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री मनुदेवी मंदिर येथे अनधिकृत व्यक्ती ट्रस्टद्वारे गैरव्यवहार करीत असल्याबाबत धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल झाली होती त्याचा निकाल लागला असून आयुक्तांनी मनुदेवी मंदिराच्या सर्व दानपेटी सील करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या आकर्षणाचे आणि भाविकांसाठी महत्त्वाचे श्री मनुदेवी मंदिर हे यावल तालुक्यातील आडगाव येथे वनपरिक्षेत्रात आहे प्राचीन हिंदू देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे . श्री मनुदेवी मंदिर या देवस्थानाची जळगाव येथील धर्मदाय विभागाकडे रीतसर नोंदणी झालेली नसताना तथा श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आडगाव तालुका यावल जिल्हा जळगाव या नावाने सदर मंदिराचे नोंदणी संबंधित फेर चौकशी जळगाव येथील धर्मदाय कार्यालयामध्ये न्यायप्रविष्ठ होती.
तरीही तेथील मनुदेवी सेवा प्रतिष्ठान या ट्रस्टचे लोक यांनी नोंदणी न करता दानपेटीतील देणगी वसूल करीत असल्याचे सत्य श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव संत श्री बाबा महा हंसराज यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजीच्या अर्जानुसार सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना निदर्शनास आणून दिले होते . त्यानुसार सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी 13 ऑक्टोबर 2023 रोजी पारित केलेले आदेशानुसार त्यांच्या अधीक्षक व निरीक्षकांनी 14 ऑक्टोबर रोजी मनुदेवी मंदिर येथील सर्व दानपेटी असेल केल्या. या दानपेठ यांच्या कुलपांना धर्मदाय कार्यालयाच्या सही शिक्क्यांनी सिल केले आहे त्यामुळे मनुदेवी सेवा प्रतिष्ठान यांनी नोंदणी करण्यात आली नव्हती तसेच हे प्रतिष्ठान अधिकृत नाही हे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया बाबा महा हंस महाराज यांनी दिली आहे
सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी आदेश देताना म्हटले आहे की नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी आडगाव येथील मनुदेवी मंदिर मधील सर्व दानपेटी यांना गावातील पंच आणि भाविक यांच्या समक्ष सीलबंद करून पंचनामा दाखल करावा, नवरात्रोत्सव संपल्यावर विश्वस्तांनी सर्व दानपेटी गावातील सरपंच, पोलीस पाटील पोलीस निरीक्षक, यांचे समक्ष उघडून त्यातील रक्कम गैर अर्जदार यांच्या बँक खात्यात जमा करावी व त्याबाबत अहवाल नवरात्रोत्सव संपल्यावर सात दिवसाच्या आत कार्यालयात सादर करावा. दानपेटीतील पंचा समक्ष मोजलेल्या रकमेबद्दल पंचनामा तयार करून सात दिवसाच्या आत कार्यालयात सादर करावा . मंदिर व मंदिर परिसरातील सर्व दानपेटी यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी अर्जदारांच्या न्यासाच्या विश्वस्तांची राहील सहाय्यक धर्मदाय आयुक्त आर एम ठवरे यांनी हे आदेश दिले आहेत.