हेमकांत गायकवाड
चोपडा: तालुक्यातील प्रख्यात असलेले श्री साई ग्रुप गणेश मित्र मंडळाच्या बाप्पाचे मोठया जल्लोषात विसर्जन केले गेले… भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना असणारे हे मंडळ नेहमी चर्चेचा विषय ठरतो..चोपडा तालुका नव्हे तर जळगांव जिल्ह्यात या मंडळाची ख्याति असते..या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे पालन करून मूर्ती लहान कीर्ती महान..असा या मंडळाने उपक्रम राबविला… मंडळाचे संस्थापक अध्यक्ष-श्री कुनालभाऊ जगताप,मराठा समाज जळगांव जिल्हाध्यक्ष-श्री.अभिजित पाटील,ग.स.सोसायटी चे ललितभाऊ पाटील,निवारा डेव्हलपर्स चे कुलदीप पाटील,मराठा समाज तालुका उपध्यक्ष परेश पाटील.रुपेश बाविस्कर, स्वप्नीलभाऊ कोळी,रोहितभाऊ बाविस्कर, रोहित देशमुख, प्रा. नितीन पाटील सर, अमित दादा पाटील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले…