वन नेशन-वन स्टुडंट आयडी; विद्यार्थ्यांसाठी आता ‘आधार’सारखं कार्ड; काय आहेत फायदे?

देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आता लवकरच ‘एक देश, एक ओळखपत्र’ असं आधार कार्ड सारखंच दस्तावेज आणण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. आधार कार्डप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी एक युनिक कोड दिला जाणार आहे.

यासाठी पालकांची संमतीची घेण्यात येणार आहे. 2020 मध्ये आणल्या गेलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा हा एक भाग आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ तयार करण्याची योजना आखली आहे. त्याला ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (APAAR) असे नाव आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘APAAR’ आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. AICTE चे अध्यक्ष टीजी सीतारामन म्हणाले, “APAAR आणि नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (NCRF) देशभरातील विद्यार्थ्यांसाठी नवीन क्यू आर कोड ( QR Code) असेल. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या प्रत्येक कौशल्याची नोंद यामध्ये दिले जाईल.”