मनसेतर्फे जळगाव जिल्ह्यात टोल नाक्यावर आंदोलन

जळगाव – महाराष्ट्र टोलमुक्त झाला पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी तालुक्यातील नशिराबाद गावानजीकच्या टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल न भरता मोटारींना सोडले.मुंबई- नागपूर महामार्गादरम्यान जळगावपासून २० किलोमीटरवरील नशिराबाद गावानजीकच्या टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, राजेंद्र निकम, महेश माळे, विकास पाथरे यांच्या नेतृत्वात तासभर आंदोलन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. देशपांडे, सपकाळे यांनी त अधिकार्‍यांना घेराव घालत प्रश्‍नांची सरबत्ती केली.

टोलसंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडत आवाहन केल्यानंतर जळगावसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र टोलमुक्त झालाच पाहिजे, राज ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली. मोटारींना पथकर न भरता सोडण्यास सुरुवात केल.

jalgaonsandesh

jalgaonsandesh