वाघूर धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ! नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा?

भुसावळ – वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने दि. २ आॅक्टोबर २०२३ वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून (सोमवार) २ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपासून वाघूर धरणातून पुर्वीचा ६७७ क्युसेक व वाढीव ६७३ क्युसेक्स एकुण १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

वाघुर नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी

नदीकाठावरील सर्व लोकांनी सावध राहावे. नदीपात्रामध्ये कोणीही प्रवेश करू नये, शेतीसाठी उपयुक्त सामान ठेवू नये किंवा गुरेढोरे सोडू नये असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव यांचे मार्फत करण्यात आले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh