कुऱ्हा पानाचे येथील पिकअप वाहन चोरट्यांच्या तालुका पोलीसांनी आवळल्या मुसक्या!

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या कुऱ्हा पानाचे औट पोष्ट च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ४०७ पिक अप वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.याबाबत भुसावळ तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथील गुरुकृपा पेट्रोल पंप जवळच लावण्यात आलेली ४०७ पिक अप वाहन क्रमांक एम एच १९ बीएम ४८४८ ही गाडी दि.७ सप्टेंबर २३ रोजी संध्याकाळी ६ ते दि ८ सप्टेंबर २३ सकाळी ८ वाजे दरम्यान चोरीस गेली असल्याची फिर्याद सोपान गजमल महाजन यांनी तालुका पोलीस स्टेशन ला दिलेली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बबनराव जगताप यांनी भेट देऊन तपास कुऱ्हा औट पोष्ट चे बीट हवालदार युनूस शेख व पोलीस कर्मचारी यांच्या कडे दिला असता भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे व पोलीस निरीक्षक बबनराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार युनूस शेख, पोहेका दिपक जाधव, पोका राहूल महाजन यांनी तपासाची सूत्रे फिरवत हर्सूल औरंगाबाद (छ.संभाजी नगर) येथून सिराज खान अब्दुल्ला खान व जाकीर पटेल (रा. हर्सूल ) यांना ताब्यात घेतले असून अटक करण्यात आली आहे. या बाबत गु र नं १३०/२०२३ भादवि कलम ३७९ दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी केलेल्या कामगीरी बाबत पोलीसांचे कौतुक केले जात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh