कजगाव येथे सशस्त्र दरोडा, दागिन्यांसह दहा लाखांचा ऐवज लुटला

भडगाव – कजगाव ता. भडगाव येथील दोन घरांवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यात घरातील सदस्यांना मारहाण करीत सोने -चांदीसह अंदाजे दहा लाखाचा ऐवज लूटून नेला. रविवारी रात्री हा प्रकार घडला.

कजगाव ता.भडगाव येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरांवर सात- आठ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. चव्हाण व देशमुख कुटूंबास मारहाण केली. नंतर कपाटातील सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम लूटून नेली. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक दाखल झाले आहे. या घटनेमुळे गावात प्रचंड घबराट पसरली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh