ममुराबाद येथील प्रकार ! ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून १०० वर्षांपूर्वींच्या झाडाची कत्तल !

तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत सदस्यावर कायदेशीर कारवाईची करणार मागणी.              ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनीच आदेश दिल्याचे उघड

ममुराबाद – : ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता ग्रामपंचायत सदस्याने गावातील शंभर वर्षापूर्वींचे लिंबाचे महाकाय वृक्ष परस्पर आदेश देऊन तोडल्याची धक्कादायक घटना आज दिनांक १सप्टेंबर रोजी उघडकीस आली आली आहे. झाडे तोडण्याचे तोंडी आदेश देणाऱ्या ग्राम पंचायतीच्या सदस्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थ तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे सांगीतले.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेले लिंबाचे झाड ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच सरपंच यांनी परस्पर लाकूड व्यापाऱ्यांना विक्री केली. व्यापाऱ्याने १ ऑक्टोंबर ला महाकाय वृक्ष जमीनदोस्त केला आहे. मात्र, याबाबत त्यांना विचारणा केली असता ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील व मालकीची ही झाडे तोडण्यासाठी ग्रामपंचायत अथवा वनविभागाची कुठलीही परवानगी अथवा लिलाव न करता शासकीय मालमत्तेची विल्हेवाट लावणे गंभीर असून याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई साठी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगीतले आहे. याबाबतची माहिती वनवि़भाग व पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशनला देखील देणार असल्याचे सांगीतले.

सदर लिंबाचे झाडाबाबत ग्रामविकास अधिकारी देसले यांना विचारणा केली असता याप्रकरणाची मला माहिती नाही. याबाबत बघून चौकशी करतो असे ग्रामविकास अधिकारी कैलाश देसले यांनी सांगितले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh