शाळेच्या वेळात शिक्षिकांचे रिल्सवर ठुमके, शिक्षण मंडळाकडे पालकांची तक्रार

शाळेच्या वेळात मुलांना शिकवण्याऐवजी शिक्षिका इन्स्टाग्राम रिल्स बनवत असल्याची तक्रार उत्तर प्रदेशमधील पालकांनी केली आहे. रिल्स अपलोड केल्यानंतर त्या पालकांना लाईक आणि फॉलो करण्यासाठीही दबाव आणत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

हा प्रकार उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे हा प्रकार उघडकीला आला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षिका शाळेच्या वेळात दररोज विविध गाण्यांवर नाचत असून त्यांची इन्स्टाग्राम अकाउंट लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, अशी तक्रार पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांकडेही दाद मागितली आहे. त्यानुसार स्थानिक शिक्षण अधिकारी गंगेश्वरी आरती यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या शिक्षिकांची नावं अंबिका गोयल, पूनम सिंग, नितू कश्यप अशी आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, शाळेत या शिक्षिका विविध गाण्यांवर रील्स बनवतात आणि मुलांना त्यांचे रील्स लाईक आणि शेअर करायला सांगतात. तसंच, मुलांकडून भांडी घासून घेणे, जेवण बनवणे आणि चहा बनवणे ही कामंही करवून घेतली जातात, अशी तक्रार मुलांनी केली आहे.

अनेक मुलांनी शाळेत योग्य ते शिक्षण दिलं जात नसल्याची तक्रार केली आहे. दरम्यान, या शिक्षिकांना याची विचारणा केल्यानंतर त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून आपण फक्त योग्य ते शिक्षण देण्यावरच लक्ष केंद्रित करत असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh