अनुसूचित जाती काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा, मनोहर पवार यांच्या प्रयत्नाला यश
प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड
भोकर – येथील भाजपा अनुसूचित तालुका अध्यक्ष अनिल डोईफोडे यांनी सतत पाच वर्षे पक्षाची एकनिष्ठ राहून प्रमाणिक कार्य करत असताना पाच वर्षाच्या काळात पक्षाने कुठलीही दखल न घेतल्याने अखेर भाजपला सोडचिट्टी घेऊन प्राध्यापक मनोहर पवार यांच्या प्रमुख भूमिकेत वेळोवेळी काँग्रेस पक्षाचे महत्त्व काँग्रेस पक्षाचे यशस्वी वाटचाल याबद्दल आणि डोईफोडे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मन वळवण्यात यशस्वी झाल्याचे बोलले जाते भोकर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यांनी पण सन्मानाची वागणूक देऊन महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क करून अनिल डोईफोडे यांना पक्षांमध्ये अनेक प्रतिष्ठाच्या उपस्थित मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, माजी जी प अध्यक्ष सौ मंगाराणी आंबुलगेकर,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश दिला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर माजी कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, संचालक रामचंद्र मुसळे, संचालक उज्वल केसराळे, अत्रिम पाटील मंगल ओबीसी नेते नामदेव आयलवाड, माजी नगरसेवक डॉक्टर मनोज गीमेकर, जवाजुद्दीन बरबडेकर, डॉक्टर फेरोज इनामदार, राजु अंगरवार विक्रम शिरसागर, मधुकर गोवंदे, श्रीमती सुलोचना ढोले अनिता साबळे इत्यादी महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.