संकल्पभूमित ‘स्वाभिमानानेच जगणार’ हा संकल्प करावा – जयसिंग वाघ

बडोदा – भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी बडोदा येथील सयाजी पार्क येथे एका झाड़ाखाली २३ सप्टेंबर १९१७ ला त्यांना त्यांच्याच अधीनस्थ कर्मचारीवर्गाकडून मिळत गेलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल चिंतन मनन केले व  माझ्या समाजातील कुणाही व्यक्तीला अपमानास्पद जीवन जगावे लागू नये. म्हणून मी माझे संपूर्ण जीवन पणाला लाविन  असा संकल्प केला तेंव्हा आपण या संकल्पभूमिवर नतमस्तक होवून ‘मी स्वाभिमानानेच जगणार’ असा संकल्प करावा असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.

बडोदा (गुजरात) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति भवन येथे आपल्या सहकारी लोकांना २३ सप्टेंबर २०२३ रोजी मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते.

आपल्या मार्गदर्शनात जयसिंग वाघ यांनी पुढं सांगितले की, बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या समवेत झालेल्या करारा प्रमाणे बाबासाहेब या इमारतीत आपल्या कामावर रुजू झाले मात्र इथ त्यांना त्यांचा साधा शिपाई सुद्धा अपमानित करत असे अधिनस्त कर्मचारी करत असलेला अपमान बाबासाहेबांनी सयाजीराव यांना सांगितला मात्र त्यांनी “परिस्थिति हळू हळू बदलेल तुम्ही संयमाने घ्या” असा सल्ला दिला बाबासाहेबांनि” मी अपमानित राहून काम करु शकणार नाही” असे सांगितले. त्या नंतर बाबसाहेबांनि आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासा करीता आपले जीवन समर्पित केले. या घटनेचे महत्व लक्षात घेवून १४ एप्रिल २००६ ला गुजरात सरकारने सयाजी पार्क ला ‘संकल्पभूमि’ म्हणून जाहीर केले व एक स्मारक उभे केले. याच भुमीच्या मागं भव्य दिव्य स्वरूपाचा बौद्ध स्तूप उभारण्यात येत आहे असेही वाघ यांनी सांगितले.

सुरुवतीस भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, संविधान यांचे पूजन करण्यात आले त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. जयसिंग वाघ यांचे स्वागत नानासाहेब कापडणे यांनी तर हिमांशु अटकाळ यांनी परिचय करुन दिला. सेवानिवृत्त पीएसआय पुरुषोत्तम परमार, बाळूभाऊ परमार यांनी बडोदा येथील आंबेडकरी चळवळ बद्दल माहिती दिली, हीरालाल तापडिया, रमेश कापडे, हिमांशु परमार, हिम्मत मौर्य व अन्य सहकारी मोठ्या संखेने हजर होते शेवटी सिद्धार्थ गाढे यांनी आभार व्यक्त केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh