सत्यशोधक समाज स्थापनेच्या दिवसानिमित्त महात्मा फुलेंना अभिवादन

प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड

भोकर – दि.24 सप्टेंबर सकाळी दहा वाजता सत्यशोधक समाज स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ओबीसी समन्वय समिती व भारतीय पिछडा संघटन जिल्हा नांदेड च्या वतीने अभिवादन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमात महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली यावर प्राध्यापक दत्ता कुंचलवाड यांनी मार्गदर्शन केले.

या अभिवादन सभेस नांदेड जिल्हा ओबीसी समाजाचे नेते नामदेवराव आयलवाड भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस जी माचनवार मार्गदर्शक नंदकुमार कोसबतवार प्रबोधनकार गोविंदराम सुरनर लक्ष्मण लिंगापुरे लक्ष्मणराव शिरसागर लक्ष्मण शिंदे प्राध्यापक दत्ता कुंचलवाड प्राध्यापक शेटे सतीशचंद्र शिंदे राजेश चुटकुलवार महाजन सूर्यवंशी बीपी बंकलवाड बालाजी थोटवे, प्राध्यापक दिलीप काठोडे, प्रकाश राठोड, दत्ता टोकलवाड, चंद्रकला चापलकर, श्रीराम राठोड, बाळू कोंडलवाडे, रामराव महाराज भाटेगावकर, सुरेश राठोड, प्रा शिवाजी इंदूरे, प्रकाश राठोड संजय मोरे, जी एल सूर्यवंशी, गारे एस एम अंकुश चापलकर इत्यादी ओबिसी बांधव ऊपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh