साकेगाव येथील चुडामण नगरात विज कोसळून तरुणीचा मृत्यू !

भुसावळ – येथून जवळच असलेल्या साकेगाव येथील नगरात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी गणेश मनोरे  (धनगर) हे आपल्या पत्नी व मुलगी सह राहतात.दि .२१ सप्टेंबर रोजी सायंकाळी अचानक आकाशात विजांचा गडगडाट सुरू असताना गणेश मनोरे यांच्या घराच्या खिडकीतून विज घरातील हर्षाली गणेश मनोरे हिच्या अंगावर पडली असता हर्षाली पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत आली आणि जिव वाचविण्यासाठी आरोळ्या मारल्या असता शेजारील लोकांनी तीला सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र जास्त प्रमाणात जळालेली असल्याने हर्षाली मनोरे चा मृत्यू झाला. या बाबत सामान्य रुग्णालयात पोलीसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली असून शुन्य नंबरखाली भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे . विज एवढ्या जोरात पडली की बांधकाम झालेली खिडकी तुटून पडली. त्यामुळे काही क्षण शेजारच्या लोकांना ही कळाले नसल्याचे सांगितले जात आहे. दोन वर्षांपूर्वी गणेश मनोरे यांच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले होते. मोठ्या मुलीचे लग्न झालेले असून गणेश मनोरे हे मोठ्या मुलीकडे नाशिक येथे गेलेले होते.

नुकतीच घटनास्थळी भुसावळ चे आमदार संजय सावकारे यांनी भेट देऊन नैसर्गिक मृत्यू झाल्याने नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रकरण करण्याच्या सूचना तहसीलदार निता लबडे भुसावळ याना दिल्या आहेत.

मयत हर्षाली च्या पश्चात आई, वडील, मोठी बहिण, मेहुणे असा परिवार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh