सुनसगाव विद्यालयाच्या कला शिक्षकाचे बैलगाडी वरुन पडल्याने अकस्मात निधन !

सुनसगाव विद्यालयाच्या कला शिक्षकाचे बैलगाडी वरुन पडल्याने अकस्मात निधन !

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप नरोत्तम महाजन ( वय ४५ ) रा.साथी बाजार नशिराबाद ता.जळगाव हे रविवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ वाजे दरम्यान शेतातील कामासाठी बैलगाडी घेऊन जात असताना बैल अचानक त्यांच्या वाड्याकडे घुसल्याने संदीप महाजन हे बैलगाडी वरुन पडले असता त्यांच्या डोक्याला मार लागला आणि नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला त्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालय जळगाव येथे दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

संदिप महाजन हे सुनसगाव येथे बीएलओ म्हणून काम पाहत होते. ते एक उत्कृष्ट चित्रकार होते त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता त्यामुळे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांच्या वडिलांचे नुकतेच चार महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आई , पत्नी , २ मुले असा परिवार आहे.