यावल तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कागदपत्रांच्या आढाव्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ‘खुश’

तालुक्यातील जनतेच्या समस्या तक्रारीचे काय..?

प्रतिनिधी – अमीर पटेल

यावल – तालुक्यातील अधिकारी प्रशासकीय गतिमानतेच्या ध्येय व उद्दिष्टानुसार तसेच शासनाच्या निकषानुसार शंभर टक्के कर्तव्य पालन करता आहेत याचा मला आनंद आणि खुशी आहे अशी आढावा बैठकीची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांना दिली. बंद खोलीत झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील अधिकाऱ्यांनी कार्यालयात तयार केलेले कागदपत्रे, अहवाल लक्षात घेता आणि तालुक्यात निघालेले विविध मोर्चे,झालेले आंदोलन, उपोषण,प्राप्त तक्रारी, प्रत्यक्षात असलेल्या समस्यांचे चौकशीचे पुढे काय झाले..? आणि काय होणार..? इत्यादी अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेमध्ये उपस्थित केले जात आहेत.

काल शुक्रवार दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास यावल तहसील कार्यालयात तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाची आढावा बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली.बैठकीत पत्रकारांना परवानगी नसल्याने बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना माहिती दिली त्यांनी लागोपाठ नॉन स्टॉप दहा ते पंधरा मिनिट पत्रकारांना माहिती दिली.त्यात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात ६५ टक्के पिक पाहणी झाली, तालुक्यात ६२ मुले कुपोषित आहेत,याकडे आरोग्य विभाग लक्ष देणार आहे,तालुक्यात एकूण ८ ठिकाणी अंगणवाड्यांची मागणी आहे, ५ जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्युत कनेक्शन देण्याबाबत वीज वितरण कंपनीला सूचना देण्यात आल्या.तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर गटविकास अधिकारी,यावल तहसीलदार यांनी वेळोवेळी साइडवर जाऊन व्हीजीट दिल्या आहेत. तालुक्यात २ गावांमध्ये रोजगार हमीची कामे झालेली नाही, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साठी शासन दरबारी प्रयत्न करणार,टीपीडीसी अंतर्गत१०० टक्के प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे,थकबाकी, वसुली बाबत, ग्रामरोजगार सेवकांबाबत,दलित,शबरी, रमाई घरकुल योजनेबाबत तसेच आयुष्यमान भारत कार्ड तालुक्यात ३२ हजार वाटप करण्यात आले अजून ८४ हजार वाटप करण्याच्या सूचना केल्या.

यानंतर तहसील कार्यालयात पत्रकारांचे जास्त प्रश्न ऐकून न घेता यावल नगरपालिकेजवळ राजे निंबाळकर यांचा इतिहासिक किल्ला पाहणी केल्यानंतर यावल नगरपालिका कामकाजाचा आढावा घेत, कामकाजा विषयी समाधान व्यक्त करून काही सूचना दिल्या.

यावल तालुक्यात अनेक शासकीय कार्यालयाच्या कामकाजाविषयी कामाच्या गुणवत्तेविषयी तालुक्यातील जनतेच्या लेखी तक्रारी, सूचना आहेत आणि यासाठी वेळोवेळी अनेक संघटना कार्यकर्त्यांनी,राजकीय पक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन, रस्ता रोको,मोर्चे उपोषण करून विविध समस्यां प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांना आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे त्या सर्व समस्यांचे प्रश्नांच्या चौकशीची काय झाले..? आणि काय होणार…? याबाबत मात्र आता तालुक्यातील जनतेमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या