कानळदा – : बऱ्याच दिवसा पासुन मागणी करूनही स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून रस्त्यासंदर्भात दखल घेतली जात नसल्याने वैतागलेल्या जळगाव तालुक्यातील कानळदा येथील ग्रामस्थांनी गावातील मयत वना भिला भोई यांचा अंत्यविधी गावातील बस स्टॅन्ड परिसरातील चौकात ग्रामपंचायतीच्या कार्यालया समोरच करण्याचा पवित्रा घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कानळदा हे गाव साधारण पंधरा हजार लोकवस्तीचे असून गावात स्मशानभूमी नाही. गेल्या काही वर्षापासून कानळदा येथील गावकरी स्मशानभूमी पासुन वंचीत असल्याने प्रेताची अवहेलना होत आहे. त्यामुळे गावात मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कुठे? असा मोठा प्रश्न कायमच निर्माण होत असतो.
गावातील वना भिला भोई यांचे वृध्दपकाळाने निधन झाले होते. परंतु गावाला स्मशानभूमी कडे जायला रस्ता नसल्याने गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी गावाच्या भर चौकातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधीची तयारी केली. संपूर्ण गावानेच निर्णय घेत मयत अंत्यविधी गावातील चौकात ग्रामपंचायत कार्यालया समोर करण्याचे ठरविले जेणे करूण यानिमित्ताने तरी ग्रामपंचायत प्रशासनाचे उघडतील.
परंतु कार्यालसमोर मोठ्या प्रमाणात गर्दि जमु लागल्यानेकाही वेळातच ग्रामपंचायती कडुन खराब झालेल्या स्मशान भुमिच्या रस्त्यावर थातुर मातुर मटेरीयल टाकण्यात आले. नंतर प्रेत अत्यंविधी साठी गावाबाहेर नेण्यात आले.
मयताच्या नातेवाईकांना तसेच गावातील ग्रामस्थांना या समस्यांबाबत विचारणा केली असता सरपंच पुंडलिक सपकाळे यांनीसरपंच पदाची धुरा सांभाळल्यापासून गावात कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाही.ग्रामपंचायत मध्ये एकतर्फी कामकाज चालत असल्याने येथील नागरिकांच्या समस्या देखील ऐकून घेतल्या जात नाही तसेच सदस्याना देखील विश्वासात घेतले जात नसल्याचे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी सांगीतले.
वित्त आयोगाच्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी पडून असतांना देखील सरपंच सपकाळे हे विकास कामांनकडे लक्ष देत नसल्याच्या देखील तक्रारी ग्रामस्यांनी यावेळी केल्या.