एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय!

महाराष्ट्र – एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

राज्य सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. २०१९ ला रद्द झालेल्या जिल्हा परिषदेच्या भरती परीक्षाचं शुल्क परत करण्यात येणार आहे. जमा केलेल्या परीक्षा फी पैकी केवळ ६५ टक्के रक्कम परत करण्यात येणार आहे. तर १०० टक्के शुल्क परत करा, अशी मागणी रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. रद्द झालेल्या जिल्हा परिषद सरळसेवा परीक्षांचे शुल्क परत करण्यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. दिलेल्या शब्दाप्रमाणे शुल्क परत करण्यासंदर्भात परिपत्रक काढल्याबद्दल रोहित पवार यांनी आभारही मानले आहेत.