महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा शाखेकडून ३ सप्टेंबरला रोजी पत्रकारांना मोफत रेणकोट,छत्री, व वार्षीक विमा वितरण

पाचोरा – संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजाभिमुख कार्यक्रम घेत नेहमीच संघटनेच्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एकमेव नावलौकिक कौतुकास्पद कामगिरी करत राहणारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना मुंबई शाखेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पत्रकार संघटनेचे दरवर्षी प्रमाणे येत्या ३ सप्टेंबर रविवार रोजी शक्ती धाम भडगाव रोड पाचोरा येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास राव अरोटे , उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या सह जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या पत्रकारांना एका वर्षाचा वार्षिक विमा यासोबत रेनकोट छत्री चे वाटप मान्यवरांच्या हस्ते होत आहे.

यावेळी समाजातील विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला पत्रकारांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन जळगाव जिल्हा सचिव अनिल आबा येवले, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा , खान्देश उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नगराज पाटील यांनी केले आहे.

ताजा खबरें