ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार लाच घेताना जाळ्यात

चोपडा – गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासह दुचाकी सोडविण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच स्वीकारताना चोपडा येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. शिवाजी बाविस्कर (५२) असे लाचखोर सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. तक्रारदार हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील असून, तक्रारदारांचे चुलत भाऊ व त्याचा मित्र २३ ऑगस्टला रात्री नऊच्या सुमारास लासूर ते सत्रासेन रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना तीन पोलिसांनी अडवून तुमच्याजवळ गांजा आहे, तुम्ही पोलीस ठाण्यात चला, असे सांगितले. नाहीतर तुमच्यावर गांजाची केस करावी लागेल.

गांजाची केस व दुचाकी सोडवायची असेल, तर आम्हाला प्रत्येकी ७५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदारांच्या नातेवाइकांकडून रात्री तीस हजार रुपये घेतले आणि दुचाकी त्यांनी ठेवून घेतली. जर तुम्हाला दुचाकी सोडवायची असेल तर उर्वरित २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. २४ ऑगस्टला तक्रारदारांकडे सहाय्यक फौजदार बाविस्कर यांनी गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी व दुचाकी सोडण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केली. अखेर तडजोडीअंती पंधरा हजार रुपये ठरले. त्यानंतर तक्रारदारांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथक नियुक्त केले. पथकाने २५ ऑगस्ट दुपारी चोपडा येथे सापळा रचत ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बाविस्कर यांना तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी चोपडा येथील शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी