टेलिव्हिजनवरील सुपरहिट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे १५ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हा शो होस्ट करणार आहेत. गेल्या २३ वर्षांपासून ते हा शो होस्ट करत आहेत.
अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या शुटींगला सुरुवातही केली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’चे १५ व्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण हा शो कधी कुठे आणि केव्हा पाहता येणार घ्या जाणून
‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या पर्वाचा पहिला भाग आज म्हणजे १४ ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. हा शो १४ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवारी रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच सोनी लाईव्हच्या ओटीटी पॅल्टफॉर्मवरही हा शो बघता येईल.
‘कौन बनेगा करोडपती १५’साठीची नोंदणी एप्रिलपासून सुरू झाली होती. ‘कौन बनेगा करोडपती’चं पहिलं पर्व २००० साली प्रसारित झालं होतं. तेव्हापासून प्रेक्षकांच्या आवडत्या शोंच्या यादीत ‘कौन बनेगा करोडपती’ पहिल्या नंबरवर आहे. या शोचं फक्त तिसरं पर्व शाहरुख खाननं होस्ट केलं होतं. बाकी सर्व पर्व अमिताभ बच्चन आपल्या अंदाजात होस्ट करत आहेत.