शिंदे गटाच्या आमदारांची दादागिरी सुरुच, संजय रायमुलकरांची ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ

मिंधे गटाचे पाचोऱ्यातील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मिंधे गटातील आणखी एका आमदाराची दादागिरी समोर आली आहे. मेहकर येथील आमदार संजय रायमुलकर यांनी एका ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यातील त्या कॉल रेकॉर्डची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे लवकरच राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा पास मागण्यासाठी साब्रा येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे यांनी आमदार संजय रायमुलकर यांना फोन केले होते. मात्र सतत फोन केल्यामुळे रायमुलकर चिडले आणि त्यांनी वानखेडे यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यांच्या या शिवीगाळीचा ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे.

शिवीगाळ करण्याची रायमुलकरांची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही त्यांनी काही लोकांना शिवीगाळ केल्याचे ऑडिओ व्हायरल झाले आहेत

ताजा खबरें