सोशल मीडियावर फेम होण्यासाठी आजकाल अनेकजण रिल्स बनवताना दिसतात. काहीवेळा या रिल्सच्या नादात लोक आपला जीव धोक्यात घालण्यासही मागे पुढे पाहत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रिल्सने अक्षरश: वेड लावलं आहे.
या रिल्स बनवण्यामध्ये तरुण किंवा तरुणींची संख्या मोठी आहे. पण आता वृद्धांनाही या रिल्सने भुरळ घातली आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका वृद्धाचा रिल्स व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक वृद्ध चक्क पेट्रोल पंपावर रिल्स बनवताना दिसत आहे. पण या रिल्समुळे तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. ज्यानंतर पोलिसांनीही त्याच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध व्यक्ती रिल्स बनवण्याच्या नादात पेट्रोलची नासाडी करताना दिसत आहे. हे त्याने जाणूनबुजून केल्याचेही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय. याआधीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये रील बनवताना अपघात झाले आहेत. त्यावेळी अशा लोकांवर कारवाईही झाली आहे, पण तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत.
रिल्सच्या नादात पेट्रोलची नासाडी, वृद्धाचा व्हिडिओ व्हायरल
एनसीआरबीने हा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, ‘केवळ तरुणच नाही तर वृद्धाना देखील रील बनवण्याचे वेड लागले आहे. अशाने स्वत:च्या आनंदासाठी आणि खोट्या प्रसिद्धीसाठी ते इतरांच्या जीवाशी खेळत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथील आहे.
व्हिडीओमध्ये एक कुर्ता-पायजमा घातलेला एक वयस्कर व्यक्ती कारच्या टाकीत स्वत:हून पेट्रोल भरत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान पेट्रोलची टाकी पूर्ण भरते. टाकीतून पेट्रोल भरून खाली पडत असतानाही तो व्यक्ती पेट्रोलचा पाईप तसाच धरून ठेवतो. अशाप्रकारे तो मोठ्याप्रमाणात पेट्रोलची नासाडी करतो. पण या प्रकारामुळे त्याला पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते.
सिर्फ युवा ही नहीं,
बुजुर्गों पर भी चढ़ा है रील बनाने का नशा।अपने खुशी एवं झूठी पब्लिसिटी के लिए कर रहें हैं आमजन के जान के साथ खिलवाड़।
• नोएडा में रील बनाने के लिए बुजुर्ग ने पेट्रोल पंप पर किया लोगो के जान के साथ खिलवाड़। सोशल मीडिया पर वीडियो हुआ वायरल। pic.twitter.com/dsBEWdPYEa
— NCIB Headquarters (@NCIBHQ) August 7, 2023
वृद्धावर पोलिसांनी केली मोठी कारवाई
व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता की, पेट्रोल पंपावरील कर्मचारी त्याच्या कारवर सांडलेले पेट्रोल पुसताना दिसत आहेत. सोशल मीडियावर वृद्धांच्या या कृतीबद्दल लोक संताप व्यक्त करत आहेत. तसेच त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूपी पोलिसांनी वृद्धाचा शोध सुरू केला, ज्यानंतर डीसीपी नोएडा यांनी ट्विट करत संबंधित वृद्धाची कार जप्त केल्याची माहिती दिली आहे. इतकंच नाही तर या प्रकरणी त्या वृद्धानेही माफीही मागितली आहे.