ग्रामपंचायतीमध्ये आता ऑनलाइन व्यवहार करता येणार असून, येत्या १५ ऑगस्टपासून त्यानुसार व्यवहार करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत, त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी तशी तयारी सुरू केली असून,आता ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा ऑनलाइन करता येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना भंडारी म्हणाले की, केंद्र सरकारने ग्रामपंचायतींना डिजिटल पेमेंटसाठी ‘भीम यूपीआय’ व ‘क्यूआर कोड’चा वापर करणे बंधनकारक केले आहे.
‘राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानं चे प्रकल्प संचालक ए. एस. भंडारी यांनी यासंदर्भातील केंद्र सरकारच्या सूचनेचे परिपत्रक जिल्हा परिषदांना दिले आहे. सर्व ग्रामपंचायतींना ‘महा-ई-ग्राम’ प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना केंद्र सरकारने यापूर्वीच दिल्या आहेत.
या पोर्टलमार्फत ग्रामपंचायत करभरणा करण्यात येऊन स्वयंचलितपणे संबंधित ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग होत आहे. या पोर्टलवरून कर भरण्यासाठी नेट बँकिंग, यूपीआय व क्रेडिट-डेबिट कार्डच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना आता घरबसल्या ग्रामपंचायत कर भरता येणार आहे.