मिशन सक्सेस! चांद्रयान-३ ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ, तुम्हीही पाहू शकता Video

नवी दिल्ली : इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले आहे की, “५ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चांद्रयान-३ या अंतराळयानाने पाहिलेला चंद्र.”

चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहचले आहे. चंद्राच्या अगदी जवळ ते पोहोचले असून २३ ऑगस्टला उतरण्याची जय्यत तयारी झाली आहे.

https://twitter.com/chandrayaan_3/status/1688215948531015681?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1688215948531015681%7Ctwgr%5E3d57fb48efddd85472aa5da4862a408ff67f10fb%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fappyet_base%2F

 

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला, तेव्हा चांद्रयानाने अवकाशातून पहिला व्हिडिओ पाठवला आहे, ज्यामध्ये अप्रतिम दृश्य दिसले. चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत केलेला प्रवेश आणि चंद्राभोवती घिरट्या मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

https://twitter.com/chandrayaan_3/status/1687831700452098048?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1687831700452098048%7Ctwgr%5E3d57fb48efddd85472aa5da4862a408ff67f10fb%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fappyet_base%2F

१४ जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर चांद्रयान-३ ने शुक्रवारपर्यंत दोन तृतीयांश अंतर कापले होते. यावेळी चांद्रयान-३ चंद्राभोवती प्रचंड वेगाने प्रदक्षिणा घालत आहे. जर सर्व काही ठीक झाले तर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. या घटनेकडे संपूर्ण देशासह जगभरातून सर्वांचे लक्ष आहे.