पत्रकार अमोल पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भुसावळ – तालुक्यातील खडका येथील रहिवाशी व दैनिक दिव्य मराठी वर्तमानपत्राचे पत्रकार अमोल जवानसिंग पाटील ( वय ३९ ) यांचे दि. ५ ऑगस्ट  रोजी रात्री १० वाजता आपल्या बहिणीच्या घरी जळगाव येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते भारतीय पत्रकार महासंघाच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत होते. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने अनेक सामाजिक संस्था मध्ये कार्यकर्ते होते. अनेक वर्षे त्यांनी दै. देशदूत चे पत्रकार म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिणी, बहिण, मेहुणे, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.