नितीन देसाई प्रकरणात सर्वात मोठी बातमी, ‘या’ पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल

.ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या एनडी स्टुडिओत स्वत:ला संपवलं. या प्रकरणी आता पोलिसांकडून कसून तपास सुरु झाला आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झालाय.

या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या आरोपींची नावं समोर आली आहेत. याप्रकरणी रायगड पोलीस लवकरच सर्वांना समन्स देवून चौकशीला बोलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खालापूर पोलिसांनी नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एडलवाईज कंपमीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आहे. यामध्ये एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांचा समावेश आहे. तसेच स्मित शाह, आर के बन्सल, जितेंद्र कोठारी, केऊर मेहता यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय.

नितीन देसाई आणि एडलाईज कंपनी यांच्यातील कर्जाच्या मुद्द्यावर एनसीएलटी कोर्टाने जी ऑर्डर दिली होती, त्यावेळी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. जितेंद्र कोठारी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली दोन्ही बाजूने चर्चा होऊन एक ठरावीक रक्कम ठरवण्याबाबत एनसीएलटी कोर्टाने निर्देश दिले होते. या प्रकरणात जितेंद्र कोठारी यांच्यावरही गुन्हा

दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोठारी आणि इतर अधिकाऱ्यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नितीन देसाई वन टाईम सेटलमेंटसाठी तयार होते?

सूत्रांकडून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नितीन देसाई हे वन टाईम सेटलमेंटसाठी तयार होते. नितीन देसाई यांची एडलवाईज कंपनीसोबत भेट झाली. पण सेटलमेंटसाठी कंपनीने होकार किंवा नकार कळवला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एडलवाईजने कर्जाच्या रकमेवर व्याज वाढवण्याची वाट पाहिली, अशीदेखील धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. एडलवाईज कंपनी एनसीएलटी कोर्टात गेली आणि कोर्टाचा आदेश नितीन देसाई यांच्याविरोधात आला.