चोपड्यात बीआरएसच्या मेळाव्यास तेलंगणा येथील मंत्र्यांची उपस्थिती..

नेत्रशिबीरातील ४६० पैकी ७० रूग्णांची मोफत मोतिबिंदु शस्रक्रिया होणार.

चोपडा – भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री ना. के. चंद्रशेखर राव यांच्या प्रेरणेने तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांच्या वाढदिवसानिमित्त तेलंगणा राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. रविंदरसिंग यांची चोपड्यात दमदार एन्ट्री झाली. चोपडा येथील न.प. नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. स. १० वाजेपासून सुमारे ४६० रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यापैकी ७० नेत्ररुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. नेत्रतपासणी डॉ. प्रकाश कोळी व त्यांचे सहकारी यांनी केली. यासाठी नंदुरबार येथील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाचे सहकार्य लाभत आहे. त्याचदिवशी श्री शिवाजी महाराज चौकात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ची शेकडों सदस्याची नोंदणी करण्यात येऊन नाट्यगृहात पक्षमेळावाही घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तेलंगणाचे कॅबिनेट मंत्री ना. रविंदरसिंग यांची उपस्थिती होती. दीपप्रज्वलन बीआरएसचे वरिष्ठ नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगेपाटील तर प्रतिमा पूजन उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ फुलहार बुके देऊन यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. स्वागतगीत जय गुरुदेव संगतचे प्रार्थनागायक खंडू महाराज (कोळंबा) यांनी सादर केले. प्रास्ताविक जगन्नाथ बाविस्कर यांनी केले. यावेळी श्री.बाविस्कर यांचा एक्कावन्न किलोचा भला मोठा फुलहार देऊन केक कापून टाळ्यांच्या गजरात वाढदिवस साजरा करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात तेलंगणा राज्यातील विकास योजनांची माहिती दिली. व जगन्नाथ बाविस्कर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात.

याप्रसंगी बीआरएसच्या जळगाव जिल्हा महिला समन्वयक सौ. कोमल पाटिल, धुळे नंदुरबार जिल्हा समन्वयक एडवोकेट अविनाश पाटील, जळगाव जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, धुळे उपजिल्हा समन्वयक विठ्ठल पाटील, शिरपूरचे ओंकारराव जाधव, आदिवासी कोळी समाजाचे नेते नामदेवराव येळवे, मोतीलाल सोनवणे यांचेसह तालुका, जिल्हा व बाहेरील पदाधिकाऱ्यांसह शेकडों कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोपडा बीआरएसचे तालुका पदाधिकारी समाधान बाविस्कर, दीपक पाटील, कोमल पाटील, मनोज पाटिल, अनिल कोळी, वर्षा चौधरी, पमाताई पानपाटील, आशाबाई सोनार, शीला पाटील, दिनकरराव सपकाळे, प्रविण कोळी ठाणेकर, आबा सोनवणे, मनिष साळुंखे, भाऊसाहेब बाविस्कर, वैभवराज बाविस्कर, विशालराज बाविस्कर यांनी विशेष प्रयत्न केलेत. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सागरकुमार कोळी (अमळनेर) यांनी केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी