आरोग्य योजनांमध्ये मिळणार 100% कव्हरेज; केंद्र सरकार सुरू करणार “आयुष्मान भव:’ कार्यक्रम

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालय ‘आयुष्मान भव’ कार्यक्रम सुरू करण्याची योजना आखत आहे जेणेकरून प्रत्येक इच्छित लाभार्थ्यापर्यंत सर्व राज्य-संचालित आरोग्य योजनांचे वितरण सुनिश्‍चित होईल.

या योजनेंतर्गत “आयुष्मान आपके द्वार 3.0′, “आयुष्मान सभा’, “आयुष्मान मेळा’ आणि “आयुष्मान ग्राम’ यांसारखे काही उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विमाधारकाला 100 टक्के कव्हरेज मिळ्याची तरतूदही करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या मोहिमेचा उद्देश सर्व आरोग्य योजनांचे सर्वसमावेशक आणि सखोल कव्हरेज सुनिश्‍चित करणे हा आहे, जेणेकरून प्रत्येक पात्र लाभार्थी लाभ घेऊ शकतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी आयुष्मान सभा ग्राम आरोग्य, स्वच्छता आणि पोषण समितीच्या नेतृत्वाखाली गावपातळीवर मोहीम सुरू करेल.

यामुळे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आरोग्य विमा योजना कार्ड आणि त्यांचे वितरण आणि आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांकाच्या निर्मितीबद्दल जागरूकता देखील वाढेल. आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रांद्वारे असंसर्गजन्य रोग आणि सिकलसेल रोगांसाठी स्क्रीनिंग सेवा वापरण्याच्या महत्त्वाबद्दल आणि क्षयरोगासारख्या संसर्गजन्य रोगाच्या निर्मूलनासाठी देखील या मोहिमेद्वारे लोकांना जागरूक करण्यात मदत होईल. आयुष्मान ग्राम, पीएमजेएवाय कार्ड वितरण, लसीकरण कव्हरेज, आभा आयडी निर्मिती, एनसीडी स्क्रीनिंग यासह इतर गोष्टींचे 100% कव्हरेज साध्य करण्यासाठी योजनेचा चौथा टप्पा कार्यान्वित केला जाणार आहे.