31 जुलैपूर्वी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 20500 रुपयांचा लाभ!

तुम्हालाही तुमच्या पैशावर जास्त परतावा हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक एफडी आणि लहान बचत योजना हे दोन कमी जोखमीचे गुंतवणूक पर्याय आहेत.
सीन‍ियर स‍िटीजन सेव्हिंग स्‍कीममधील उपलब्ध व्याजदर सध्या विक्रमी पातळीवर आहे. गुंतवणुकीसाठी या पर्यायाचा विचार करुन तुम्ही अधिक लाभ मिळवू शकता. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 8.2 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

गुंतवणुकीची मर्यादा 15 लाखांवरुन 30 लाखांपर्यंत वाढवली

दरम्यान, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणाली लागू करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली होती. या अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मधील गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपयांवरुन 30 लाख रुपये करण्यात आली आहे.

या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) गुंतवणुकीवर पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळत आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत व्याजदर 8.2 टक्के झाला आहे. मागील तिमाहीत तो 8 टक्के होता. त्यापूर्वी त्याचा व्याजदर 7.6 टक्के होता आणि गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपये होती.

पूर्वी दरमहा 9500 नफा मिळत होता

गुंतवणुकीची (Investment) कमाल मर्यादा वाढवल्यामुळे आणि व्याजदरात वाढ केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून दरमहा व्याजाच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न दुप्पट झाले आहे.

यापूर्वी या योजनेत 15 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीवर 7.6 टक्के व्याजाने 20.70 लाख रुपये मिळत होते. जे वार्षिक 1.14 लाख आणि मासिक 9500 रुपये होते.

आता 20500 रुपयांचा फायदा होणार आहे

अर्थमंत्र्यांकडून गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत वाढवल्यास आणि व्याजदर 8.2 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास, पाच वर्षांच्या मॅच्‍युर‍िटीवर 12.30 लाख रुपयांच्या व्याजासह एकूण 42.30 लाख रुपये मिळतील.

त्याची वार्षिक आधारावर गणना केली तर ते 2 लाख 46 हजार रुपये आणि मासिक आधारावर 20500 रुपये होते. म्हणजेच अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता ज्येष्ठ नागरिकांना 9,500 रुपयांच्या तुलनेत 20,500 रुपये मिळणार आहेत.

योजना काय आहे

देशातील वृद्ध नागरिकांसाठी सरकारतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’ चालवली जाते. ही योजना सुरु करण्यामागे सेवानिवृत्त व्यक्तींना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा व्याजाच्या स्वरुपात पैसे मिळतात.

1.5 लाखांपर्यंत कर सवलत

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत, व्याज दर तिमाही आधारावर सरकार सुधारित करते. यामध्ये पती-पत्नी दोघेही एकमेकासोबत एकच खाते किंवा संयुक्त खाते उघडू शकतात. विशेष म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते.