डांभुर्णी येथील जि. प. शाळेचा अजब कारभार; पाहिलीचा वर्ग भरतो चक्क व्हराड्यात

जळगाव – डांभुर्णी (ता. यावल) येथील जि.प. शाळेत इयत्ता पहिलीचे विद्यार्थी चक्क ओट्यावर बसून शिक्षण घेत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणार्‍या प्राण्यांसह माकडांचाही या शालेय परिसरात वावर असताना ओट्यावर विद्यार्थ्यांना बसवणे कितपत योग्य? असा सवाल पालकांकडून उपस्थितीत होत आहे. प्रशासन व शिक्षण समितीने या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गखोली नसल्याने मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच तिसरीच वर्ग भरवला जात आहे. शालेय कामानिमित्त आलेले नागरिक याच वर्गात येत असल्याने दोन जणांमधील होत असलेल्या संवादाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा फटका बसत आहे.
याबाबतीत मुख्याध्यापक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पहिलीच्या व तिसरीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खोलीच नाही. पहिलीचा वर्ग केंद्रप्रमुखांच्या दालनात बसवण्याची व्यवस्था केली, परंतु ते पावसाच्या पाण्याने गळते म्हणून त्यांना ओट्यावर बसवावे लागत आहे. तिसरीचा वर्ग हा माझ्या ऑफिसात बसवावा लागत असल्याचे पाटील यांनी सांगितलं.

लोकवर्गणीतून शाळेची सुधारणा

काही वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून या शाळेची सुधारणा करण्यात आली, असे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, खोल्याची डागडुजी झाली खरी परंतु ती फक्त दिसणार्‍या भागाची खोल्यांचा आतील मागील भाग व वरचे छत तसेच पडून असल्याने पावसाळ्यात त्याही खोल्या गळत असल्याचे सांगण्यात आले.

खोल्या मंजुरीसाठी प्रशासनाला प्रस्ताव

शाळेकडून नवीन तीन खोल्या मंजुरीसाठी प्रशासनाला प्रस्ताव पाठवला असल्याचेही मुख्याध्यापकांनी सांगितले तसेच ग्रामपंचायतीकडून खोलीतील बैठक व्यवस्था सुधारण्यासाठी तगादा लावला मात्र, पंचायतीकडून काम न झाल्याची खंत देखील मुख्याध्यापकांंनी यावेळी व्यक्त केली.

एका खोलीचा अभाव

या शाळेत एकूण सात खोल्या आहेत. यातील एक खोली मुख्याध्यापकांसाठी गेली. एका वर्गाच्या दोन तुकड्या भरतात. पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. यामुळे अशा एकूण आठ खोल्या पाहिजेत. प्रत्यक्षात सहा खोल्या आहेत. एक वर्ग मुख्याध्यापकांच्या खोलीत भरतो. पहिलीची एक तुकडी ओट्यावर भरविण्याची वेळ शाळेवर आली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं