योगी आदित्यनाथ, PM मोदी टार्गेटवर, मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करणार

मुंबई – पोलिसांच्या वाहतूक शाखेला पुन्हा एकदा धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या टार्गेटवर आहेत. तसेच मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला करणार आहे. त्यासाठी काही ठिकाणी काडतुसे आणि एके 47 असल्याचे देखील धमकी देणाऱ्याने मेसेजमध्ये म्हटले आहे. या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम 509 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.