जे तेलंगणात होऊ शकते ते महाराष्ट्रात का नाही ? बीआरएसचे सदस्य जगन्नाथ बाविस्कर यांचा खडा सवाल.

चोपडा (प्रतिनिधी):-सन २०१४ मधे तेलंगण राज्याची निर्मिती झाली.अवघ्या ८/९ वर्षात तेलंगाणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रिय अध्यक्ष के.चंद्रशेखर राव (के.सी.आर) यांनीशेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांसाठी विशेष योजना राबवून तेलंगणा राज्य समृद्ध केले आहे. नुकतेच चोपडा येथील आदिवासी कोळी समाजाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावलेकर) हे हैद्राबाद येथे बीआरएस पक्षप्रवेशासाठी जाऊन आलेत.त्यांचा पक्षप्रवेश नाशिक विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव, धुळे नंदुरबारचे समन्वयक एडवोकेट अविनाश पाटील, चोपडा समन्वयक समाधान बाविस्कर, तालुकाप्रमुख दिपक पाटिल यांनी घडवुन आणला. यावेळी त्यांनी अर्थमंत्री ना.हरिश राव व अन्नमंत्री ना.रविंदरसिंग यांची भेट घेऊन तेलंगणा राज्याच्या विकासाबाबत माहिती जाणुन घेतली. प्रामुख्याने त्या राज्यातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत विज व पाणी, पेरणीसाठी एकरी १०,००० रू.मदत, नदी जोड प्रकल्पामुळे १०० टक्के क्षेत्र सिंचनाखाली, शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यास ( अपघाती किंवा नैसर्गीक) कुटुंबीयांना रू.५ लाख ची तात्काळ मदत, सरकार स्वतः धान्य खरेदी करते, दुःखद व आकस्मिक प्रसंगासाठी १०० टक्के प्रिमियम देणारी विमा योजना सरकार स्वतः राबवते, शेतकरी मंच योजनेद्वारे ५००० एकर चा एक समुह करून त्यासाठी एक स्वतंत्र कृषी अधिकारी काम करतो, कल्याण लक्ष्मी व शादी मुबारक योजने अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी रू. १ लाख १०० ची विना अट तात्काळ मदत, जेष्ठ नागरिकांना व एकट्या स्रियांना दरमहा रू.२०१६ पेन्शन, दिव्यांगासाठी दरमहा रू. ३०१६ पेन्शन, गरीब,गरजु लोकांना १०० टक्के अनुदानावर २ बेडरूम किचन घरे, दलीत व आदिवाशींना उद्योग करणाय्रांसाठी प्रोत्साहन योजना, दलितांना प्रत्येक कुटुंबास विना परतफेड रू.१० लाख एकरकमी दिले जातात, धनगर बांधवांना पालनासाठी मोफत मेंढ्या वाटप केल्या जातात, मिशन भगीरथ अंतर्गत शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी तर पिण्यासाठी प्रत्येक घरात नळ, स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा, गरोदर व स्तनदा मातांसाठी मोफत सर्व आरोग्य सुविधा, बाळाच्या जन्मानंतर रू.१२००० तर मुलीच्या जन्मानंतर रू.१३००० संगोपनासाठी दिले जातात, कंटी वेलमु जगातील सर्वात मोठे नेत्र शिबीर राबवले, आपले गाव आपली शाळा शिक्षण योजना राबवून शिक्षणावर भर,

यामुळे तेलंगणा एक समृद्ध राज्य झाले आहे. शेतकरी समृद्ध झाल्याने एकही आत्महत्या नाही. महाराष्ट्र राज्य तर नैसर्गीकरीत्या समृद्ध आहे. वरील सर्व गोष्टी महाराष्ट्रात करणे सहज शक्य आहे. पण राज्यकर्त्यांची तशी मानशीकता नाही. म्हणुन तमाम शेतकरी पुत्रांनी कष्टकय्रांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बेगडी प्रेम दाखवणाय्रा सर्वच पक्षांना विचारले पाहिजे की, जे तेलंगणात होवू शकते ते महाराष्ट्रात का होत नाही ? असा खडा सवाल भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) चे सदस्य जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकान्वये उपस्थित केला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी