नशिराबाद ( जितेंद्र काटे ) नशिराबाद येथे अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून याकडे नगरपरिषद कार्यालयाचे अतिशय गंभीर दुर्लक्ष होत आहे. सध्या नशिराबाद येथे प्रशासक व मुख्याधिकारी राज आहे त्यामुळे की काय ? गावातील समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. याचाच एक भाग म्हणून नशिराबाद पोलीस स्टेशन जवळ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या समोर पाण्याचे मोठे डबके साचलेले आहे तर याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत . वास्तविक पाहता या रस्त्यावरून नेहमी नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते त्यामुळे एखादे वाहन या पाण्यातून गेल्यास चिखल अंगावर उडतो आणि बऱ्याचदा बाचाबाची होते . त्यामुळे नशिराबाद नगरपरिषद च्या प्रशासक व मुख्याधिकारी यांनी या बाबत तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.