पारोळा – पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी एका ग्रामसेविकेचा वारंवार छळ करीत शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी दिनांक ८ जुलै शनिवार रोजी पिडीत ग्रामसेविकेच्या फिर्यादी वरून गटविकास अधिकारी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका ग्रामसेविकेकडे दोन गावांचा पदभार असून त्या आपल्या पदावर काम करत असतांना दि.१२ डिसेंबर २०२१ पासून रुजू झालेले गटविकास अधिकारी विजय दत्तात्रेय लोंढे (वय ४४) रा. जळगाव यांच्याकडून वारंवार छळ केला जात होता. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेला आपल्या दालनात बोलून चित्र विचित्र प्रकारे हावभाव करत आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न केला. ही बाब ग्रामसेविकेच्या लक्षात आल्यावर तिने गटविकास अधिकारी यांना सांगितले की, मी त्यातली नाही, मी माझ्या पतीला सांगेल. त्यावर गटविकास अधिकारी यांनी तू जर कोणाला सांगितले तर, मी तुला बदनाम करून टाकेल असे धमकी दिली यानंतर देखील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या दिवशी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेस कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बाबत जाब विचारण्यासाठी गेली असता गटविकास अधिकाऱ्यांने त्या महिला ग्रामसेविकेस अजुन वेळ गेली नसल्याचे सांगितले. या प्रकारास कंटाळून महिलेने जादा प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्याने तिची प्रकृती बिघडली.
यातुन बरे वाटू लागल्याने तिने दिनांक ०८ शनिवार रोजी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये बिडीओ दत्तात्रेय लोंढे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत तपास फौजदार शिंदे करीत आहेत.