मोबाईल दुकानदाराची गजब ऑफर! स्मार्टफोन घ्या अन् २ किलो टोमॅटो मोफत मिळवा …

देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्र, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये प्रचंड वाढले आहेत.

दरम्यान मध्य प्रदेशात टोमॅटो महाग झाल्यानंतर शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. या ऑफरची चर्चा सर्वत्र रंगली आहे

मध्य प्रदेशात टोमॅटोच्या किमती वाढल्यानंतर आता शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी अनोखी ऑफर दिली आहे. मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची ऑफर आणली आहे. शहरात टोमॅटोचे भाव 160 रुपयांच्या पुढे गेले आहेत.

अशोक नगर येथील भाजी मंडईत टोमॅटो 160 रुपये किलोच्या पुढे विकला जात आहे. शहरातील अभिषेक मोबाईल शॉपीतील तरुण व्यावसायिक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, आजच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल शोरूममध्ये विविध ऑफर्स दिल्या जातात. अशा स्पर्धेच्या काळात जेव्हा आम्हाला कळले की, टोमॅटोचे भाव वाढले आहेत आणि भाजी बाजारात टोमॅटो 160 रुपये किलोने विकला जात आहे, तेव्हा आम्ही स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला.

मोबाईल शोरूमचे मालक सांगतात की, जेव्हापासून त्यांनी दुकानात ही योजना लागू केली आहे, तेव्हापासून ग्राहकांची संख्या वाढली आहे, या काळात अनेक लोक येऊन विचारत आहेत की, या दुकानात टोमॅटोची ऑफर सुरू आहे, ती रोज आहे का? ग्राहकांना 50 किलो पेक्षा जास्त टोमॅटो ऑफर म्हणून देण्यात येणार आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा आहे. एका हिंदी वेबसाईटने या संबधीचे वृत्त दिलं आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh