कर्ज काढून पत्नीचे स्वप्न केले पूर्ण, नर्स झाल्यावर म्हणाली स्टेटस जुळत नाही

उत्तर प्रदेशात एक विचीत्र घटना घडली आहे. एका व्यक्तीने बायकोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून तिला शिकवले. ती शिकून नर्सही झाली आणि तिला नोकरीही मिळाली. पण त्यानंतर पत्नीने जे वागली त्याने सगळ्यांनाचा धक्का बसला.

कानपूर देहात येथील रविंद्र पुरम गाला येथील ही घटना आहे. येथे राहणाऱ्या अर्जुनचे लग्न 2017 मध्ये बस्ती जिल्ह्यात राहणाऱ्या सविता मोर्यासोबत झाले होते. सविता सुरूवातीपासूनच महत्वाकांशी असल्याने तिने तिच्या पतीसमोर शिक्षण घेऊ आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करण्याचे अर्जुनने मनावर घेतले. परिस्थिती बेताची असतानाही त्याने मेहनत मजूरी करुन तिचा कानपुरच्या मंधना येथील रामा कॉलेज ऑफ नर्सिंग अॅण्ड पॅरा मेडिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला.

सविताच्या शिक्षणादरम्यान त्याने कधीच तिला पैशांची चणचण वाटू दिली नाही. तो तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दर महिन्याला पत्नीसाठी पैसे पाठवायचा. विशेष म्हणजे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सविताला दिल्लीच्या एका रूग्णालयात नोकरी मिळाली. तिला नोकरी मिळून काही दिवस उलटल्यानंतर अर्जुनला तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागलाय आणि त्याने तिला पुन्हा घरी बोलावले. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर तिला कानपूर देहात येथील रसूलाबादच्या नारखुर्द येथील स्वास्थ्य केंद्रात लावली. तिथे सविता चांगला पगारही देण्यात आला. मात्र त्यानंतर सविताच्या स्वभावात बदल झाला आणि त्यानंतर ती अर्जुनला सारखी काळा असल्याबाबत बोलून त्याचा अपमान करू लागली. त्यानंतर तर ती त्याला थेट तू मला आवडत नसल्याचे बोलू लागली आणि आपलं स्टेटस जुळत नाही. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा आला. दुखावलेल्या अर्जुनने आता शासनाकड़े मदतीची हाक मारली आहे.