राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार बंडखोर आमदारांना घेऊन सत्ते सहभागी झाले. एवढेच नाही तर त्यांनी थेट पक्ष आणि चिन्हावरही दावा ठोकला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचे पत्र आमदारांच्या सह्यांसह निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षात सध्या अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे पक्षसंघटनेवरील पकड मजबूत करण्यासाठी शरद पवार थेट मैदानात उतरले असून त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे.
शरद पवार आपली पहिला जाहीर सभा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातील येवला येथे घेत आहेत. या सभेपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शरद पवार पावसामध्ये चिंब भिजल्याचे दिसत आहे. येवला येथे सभेला जाताना शरद पवार यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. यादरम्यान पावसानेही हजेरी लावली. यावेळी पावसाची पर्वा न करत पवार कार्यकर्त्यांना भेटले. यामुळे त्यांचा शर्ट चिंब होऊन अंगाला चिकटला आणि हाच फोटो सुप्रिया सुळेंनी शेअर केला आहे. यासोबत त्यांनी ‘भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं, ना थका हूँ ना हारा हूँ, रण में अटल तक खडा हूँ मैंट, असे सूचक कॅप्शनही दिले आहे.
भाग गए रणछोड़ सभी,
देख अभी तक खड़ा हूँ मैंना थका हूॅं ना हारा हूॅं
रण में अटल तक खडा हूॅं मैं pic.twitter.com/5mmGYWBm3o— Supriya Sule (@supriya_sule) July 8, 2023