रावेर – येथून जवळच ऐनपुर येथील 33/11केव्ही उपकेंद्रात सकाळी 4 वाजता बिघाड झाल्याने ऐनपुर उप केंद्राला लागून असलेल्या 10 ते 12 खेडे गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.त्यातच पावसाचा अभाव,ढगाळ वातावरण,आणि आद्रता खूप असल्याने विजेविना लोकांना उकाडा सहन करावा लागला. आणि असे एकदा नाही तर अनेक वेळा होत असते.त्यामुळे परिसरातील कोडदा, कांडवेल, सुलवाडी, वाघाडी,रेंभोटा, शिंगाडी,भामलवाडी. ई. गावांना रात्र भर अंधारात राहावे लागते.वीज नियमित सुरू होत नाही तोपर्यंत नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. काल तर 37/38 अंश सेल्सिअस तापमान असल्याने नागरिक घामाघूम झाले होते. जो पर्यंत चांगला पाऊस पडणार नाही तोपर्यंत असाच उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल अशी लोकांमधे चर्चा सुरू आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. आणि उपकेंद्रात फोन केला तर फोन सुद्धा बंद असतो असे लोक सांगत आहे.