ममुराबाद येथे बैल पोळा सण शेतकऱ्यांकडून उत्साहात साजरा

जळगाव – तालुक्यात बैल पोळ्याचा सण शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त काही सधन शेतकऱ्यांनी वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या मिरवणुका काढल्या. या मिरवणुकीमध्ये वृध्द शेतकऱ्यासह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

https://youtu.be/ggaCtlE57cA

वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मिञ बैल यांना बैलपोळ्याच्या दिवशी गळ्यांत चंगाळी शिंगाना कलर अंगावर कलरने विविध प्रकारची सजावट अंगावर झुली या पध्दतीने पोळ्यानिमित्त सजवुन बैलांची व इतर पशु धनाची गावागावातून काही सधन शेतकऱ्यांकडुन मिरवणुका काढण्यात आल्या. घरात पुरण पोळीचा स्वयपाक करुन बैलाची पुजा करुन बैलाना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो. यावर्षी मागील काही आठवड्यांपासुन पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील असलेले प्रमुख पिक सोयाबीन व उडीदाच्या उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. माञ तरीही बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला आहे.बैलपोळ्या निमित्त या भागात शेतकरी दिवसभर उपाशी राहुन बैलाचा उपहास करतात बैलांना दुपारी पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंरच शेतकरी जेवण करतात. बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करुन घरी पूरण पोळीचा स्वयपाक करुन बारा वाजणेच्या सुमारास बैलाची व इतर पशुधनाची विधीवत पुजा करुन बैलाना व इतर पशुधनाला पुरणपोळीचे जेवण दिल्यानतंर शेतकऱ्यांनी जेवण करुण उपवास सोडला.