जितेंद्र काटे सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील कंडारी रोड उर्दू शाळे जवळील निंबाच्या झाडाची मोठी फांदी पडून एक मजूर जखमी झाल्याची घटना घडली.
या बाबत माहिती अशी की दि ४ रोजी दुपारी अचानक वारा वादळामुळे वराडसिम येथील मजूर काशिनाथ रामचंद्र पारधी ( वय ६० ) हे शेती चे काम आटोपून घराकडे येत असताना निंबाच्या झाडाची मोठी फांदी पडली त्यात काशिनाथ पारधी यांच्या डोक्याला मार लागला तसेच हीच फांदी म्हशीच्या अंगावर पडली असता रेडा जखमी झाला तसेच त्या ठिकाणी निंबाच्या झाडाखाली असलेल्या मोटरसायकल चे नुकसान झाले आहे . घटनास्थळी गावातील , पोलीस पाटील सचिन वायकोळे , तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ पाटील , सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील , विजय कोळी , प्रकाश ठाकूर , यांनी धाव घेतली तर रविंद्र कुंभार ,खेमचंद्र कोळी ,प्रेम कोळी ,दिलीप सुतार , हर्षल पाटील ,प्रविण कोळी यांनी जखमींना मदत केली तसेच रस्ता वाहतुकीसाठी खुला केला असे काशिनाथ पाटील यांनी सांगितले.